Maha Tourse &travlling
* महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे
मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे.
आपले महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते.
आपल्या राज्याचा देशातील आर्थिक प्रगतीवर खूप मोठा वाटा आहे.
महाराष्ट्र राज्याला साधारणता 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्र मध्ये बरीच धार्मिक,ऐतिहासिक, आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र बरोबर भारतातील बरेच पर्यटक नेहमी उत्सुक असतात.
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमधून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळ कोणती आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे.
चला तर मग सुरु करूया.
नंबर 10 अलिबाग
अलिबाग हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अलिबाग या ठिकाणी असणारे समुद्रकिनारे हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात.
येथे असणारे स्वच्छ सुंदर आणि नयनरम्य समुद्रकिनारी पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात.
अलिबाग हे नाव आली नावाच्या व्यक्तीमुळे पडले आहे. या व्यक्तीकडे खूप सार्या बागा होत्या म्हणून या शहराचे नाव अलिबाग असे ठेवण्यात आले.
अलिबाग मध्ये मांडवा बीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. याव्यतिरिक्त ही अलिबाग मध्ये मुरुड बीच, वर्सोली बीच, नागाव बीच, कीहिम बीच, खांदेरी किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला अशा अनेक ठिकाणांना पर्यटक व्हिजिट करत असतात.
नंबर 9 माथेरान
माथेरान हे पर्यटन स्थळ भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. जे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.
माथेरान या हिल स्टेशनची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणता 2600 फूट इतकी आहे.
माथेरान हे पर्यटन स्थळ संपूर्णतः नयनरम्य ठिकाणांनी,घनदाट झाडांनी आणि लाल पायवाटानी बहरलेले आहे.
माथेरान या ठिकाणी आपल्याला एक नव्हे तर तब्बल 38 व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला पॅनोरमा पॉईंट, लुईसा पॉइंट, सनसेट पॉईंट, अशा सुंदर ठिकाणांना भेट देता येईल.
नंबर 8 कास पठार
कास पठार हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
सातारा शहरापासून हे ठिकाण जवळपास 22 किलोमीटर एवढे अंतरावर आहे मित्रांनो जर तुम्हाला निसर्गाने भरलेल्या वेगवेगळ्या फुलांचा आनंद घ्यायचा असेल तर या कास पठाराला नक्की भेट द्या.
कास पठारावर वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ फुले आपल्याला पाहायला मिळतील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते.
कास पठारावर आल्यानंतर आपल्याला जवळच असणारा कास तलाव देखील पाहायला मिळतो.
या पठारावर आपल्याला सातारी, वायूतारा, कासा, तेरडा, सोनकी, चवर अशी अनेक वेगवेगळ्या प्रजातीची फुले पाहायला मिळतील.
Top 10 Tourist Places in Maharashtra in Marathi
नंबर 7 तारकर्ली बीच
तारकर्ली बीच हा महाराष्ट्रातील प्रमुख आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. तारकर्ली हे कोकणातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.
तारकर्ली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणून मान्यता ही मिळालेली आहे.
हा सुंदर बीच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण या तालुक्यांमध्ये आहे.
असे म्हटले जाते की निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या तारकर्ली बीचला आयुष्यात एक वेळेस तरी नक्की भेट द्यायला हवी.
मालवण पासून तारकर्ली हे गाव सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
तारकर्ली बीचवर असणारी बांबू आणि सुपारीच्या झाडाची हिरवळ पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. हा बीच आरामदायक वेळ घालवण्यासाठी नक्कीच योग्य पर्यटन स्थळ आहे.
नंबर 6 महाबळेश्वर
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जे महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.
सह्याद्री पर्वतरांगाच्या माथ्यावर बसलेले महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1372 इतक्या उंचीवर वसलेले आहे.
महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्स साठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणाऱ्या पॉइंट्स वरून पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असतात.
महाबळेश्वर मध्ये एलिफंट पॉइंट, याव्यतिरिक्त बरेच पॉईंट पाहायला मिळतात.
असे म्हटले जाते की महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी ऑल टाइम फेवरेट जागा आहे.
नंबर 5 गणपतीपुळे
गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे हे ठिकाण महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे.
गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे मंदिर हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे. हे गणपती मंदिर जवळपास 500 वर्षे जुने आहे असे म्हटले जाते.
गणपतीपुळे हे मंदिर समुद्रकिनाऱ्या लगत असल्याने पावसाळ्यात समुद्राच्या लाटा या मंदिरापर्यंत येत असतात.
महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व भाविक भक्त आवर्जून या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
गणपतीपुळे या ठिकाणी आपण गणपतीपुळे समुद्रकिनारा, शेंबेकरचा मठ, भिडे समाधी, चंडिका मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतो.
नंबर 4 लोणार सरोवर
लोणार सरोवर हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर ची निर्मिती ही नैसर्गिक घटनेमुळे म्हणजेच उल्कापातामुळे झालेली आहे.
लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या मंदिरातून सरोवराचे नैसर्गिक रूप पाहता येईल या लोणार सरोवराला संपूर्ण जगभरात ओळखले जाते.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेसाल्ट खडक आढळून येतो. लोणार सरोवराचे संवर्धन करण्यासाठी लोणार या सरोवराला वन्य अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे.
महाराष्ट्र मध्ये असणारे सात आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य आहे.
लोणार सरोवर हे एक निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि देश विदेशातील पर्यटक आवर्जून येत असतात.
नंबर 3 अजिंठा लेणी
अजिंठा लेणी हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.
अजिंठा लेण्या या हजारो वर्ष जुने असल्याने या लेणीला भेट देण्यासाठी देश-विदेशातून बरेच पर्यटक येत असतात.
युनेस्को या जागतिक वारसा संघटनेने अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
अजिंठा लेणी या ठिकाणी 29 बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध यांची भाव मुद्रा व सुंदर चित्र रंगवलेले आहे.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी वर्षभर खुले असतात. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत या लेण्या पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो.
औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर या शहरापासून या लेण्या जवळपास 107 किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत.
नंबर 2 लोणावळा
लोणावळा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या मधोमध आहे.
हे थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत लोणावळा हे पर्यटन स्थळ वसलेले आहे.
या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण आणि डोंगरदऱ्या या येथे येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात.
पावसाळ्यात उन्हाळ्यात बरेच पर्यटक लोणावळा या ठिकाणी येऊन मनमुराद आनंद घेत असतात.
लोणावळा या ठिकाणी आपल्याला राजमाची पॉईंट, भुशी डॅम, वाळवण डॅम, कार्ला भाजा लेणी अशा अनेक सुंदर सुंदर ठिकाणांना भेट देता येईल.
लोणावळा हे पर्यटन स्थळ पुण्यापासून 63 किलोमीटर तर मुंबईपासून 96 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
नंबर 1 मुंबई
मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सुंदर पर्यटन स्थळांसाठी ओळखले जाते.
मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राचा सर्व राजकीय कारभार हा मुंबईतूनच पाहिला जातो.मुंबईमध्ये जगातील मोठमोठे उद्योग स्थित आहे.
मायानगरी या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर हे फिल्म इंडस्ट्रीसाठीही प्रसिद्ध आहे.
मुंबई हे शहर फक्त औद्योगिक व राजकीय केंद्र नसून संपूर्ण भारतातील एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
मुंबई शहराला भेट देण्यासाठी आणि पर्यटन स्थळाचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देश-विदेशातून अनेक पर्यटक आवर्जून या शहराला भेट देत असतात.
या ठिकाणी आपल्याला गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.
तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.
महाराष्ट्रातील या दहा पर्यटन स्थळांपैकी तुम्ही कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिलेली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आम्ही दिलेली महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे (Top 10 Tourist Places in Maharashtra) या लेखाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. 10*
Comments
Post a Comment